भारत पाक सामना नकोच

काही महिन्यांपूर्वी गौतम गंभीरने भारत पाकिस्तान सामने व्हायलाच नाही पाहिजे असे म्हटलं होतं.

भारतीय जवानापेक्षा क्रिकेट मोठं नाही

आपल्या जवानांच्या जीवापेक्षा क्रिकेटचा सामना मोठा नाही. राजकारणाला क्रिकेटपासून वेगळं करणं शक्य नाही, असेही गौतम गंभीर म्हणाला होता.

ट्रोलर्सच्या निशाण्यावर गौतम गंभीर

मात्र आता त्याच सामन्यात कॉमेंट्री केल्याने गौतम गंभीर ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे.

गौतम गंभीर हा ढोंगी आहे

लोकांनी गौतम गंभीरचे हे जुने विधान शोधून काढले आणि त्याच्यावर जोरदार टीका केली आहे. गौतम गंभीर हा भारतातील सर्वात मोठा ढोंगी आणि संधीसाधू आहे असे लोकांनी म्हटलं आहे.

कॉमेट्री करुन मिळतायत कोटी रुपये

आशिया चषक स्पर्धेत कॉमेंट्री करुन समालोचकांना लाखो कोटी रुपये मिळतात. याच चषकाच्या सामन्यात गौतम गंभीर कॉमेंट्री करताना दिसला आहे

याआधीही मांडली होती आक्रमक भूमिका

विश्वचषकात पाकिस्तानला न खेळवण्याबाबत गंभीर अनेकदा बोलला आहे. आपण विश्वचषकातून बाहेर पडलो, तरी आम्ही पाकिस्तानशी खेळू नये, असेही त्याचे म्हणणे आहे.

सध्या काय करतोय गौतम गंभीर?

जेव्हा एखादा सामना असतो तेव्हा गंभीर समालोचक आणि तज्ञ म्हणून अनेकदा काम करतो. इतकेच नाही तर तो अलीकडेच लेजेंड्स लीग क्रिकेटमध्येही खेळला होता. (सर्व फोटो - PTI)

VIEW ALL

Read Next Story