Virat-Rohit Bromance : भर सामन्यात रोहित-कोहलीचा ब्रोमान्स, चाहतेही भारावले

तुम्हीही असं अनेकदा ऐकलं असेल की, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचं एकमेकांशी पटत नाही. दोघेही एकमेकांना आवडत नाहीत. रोहित-कोहली यांच्यात भांडण सुरू आहेत.

पण आता दोघांच्या ऑन फिल्ड ब्रोमान्सने या सर्व गोष्टींना पूर्णविराम दिला आहे. या दोघांचा ब्रोमान्स पाहून चाहतेही हैराण झालेत.

श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाचा स्लिपमध्ये रोहित शर्माने अप्रतिम झेल घेतला.

यावेळी झेल घेतल्यानंतर विराट कोहली पहिल्यांदा त्याच्याकडे सेलिब्रेशन करण्यासाठी आला आणि त्याने येताच खाली बसलेल्या हिटमॅनला मिठी मारली.

आता विराट आणि रोहितच्या या क्षणाचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

चाहत्यांना हा फोटो आवडला असून ते विविध कमेंट्स देखील करतायत!

VIEW ALL

Read Next Story