वर्ल्ड कपच्या इतिहासात रचला नवा विश्वविक्रम
नेदरलँडचा पराभव करत ऑस्ट्रेलिया संघाने रेकॉर्ड रचला. कांगारूंनी स्वत:चा रेकॉर्ड मोडून वर्ल्ड कपमध्ये एक नवा इतिहास लिहिला आहे.
ऑस्ट्रेलियाने नेदरलँडचा तब्बल 309 धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाने 399 धावा केल्या होत्या. तर नेदरलँडचा संघ 90 धावांवर ऑलआऊट झाला.
ऑस्ट्रेलियाने हा सामना 309 धावांनी जिंकून वर्ल्ड कपच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय नोंदवला आहे.
ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नर याने 104 धावांची खेळी केली अन् धमाकेदार सुरूवात करून दिली.
तर ग्लेन मॅक्सवेल याने 40 बॉलमध्ये शतक ठोकत वर्ल्ड कपमधील सर्वात जलद शतक ठोकलं आहे.
ऑस्ट्रेलियाने 2015 च्या वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानचा 275 धावांनी पराभव केला होता. मात्र, आता कांगारूंनी स्वत:चाच रेकॉर्ड मोडून काढलाय.
या यादीत टीम इंडिया तिसऱ्या स्थानी आहे. इंडियाने 2007 साली बर्मुडाचा 257 धावांनी पराभव केला होता. त्यावेळी इंडियाने 414 धावांचा डोंगर उभारला होता.