बाबर आझम Ladies Jeans वापरतो? सोशल मीडियावरील तरुणीबरोबरच्या फोटोवरुन तुफान ट्रोलिंग

मैदानाबाहेरील कारणामुळे ट्रोल

पाकिस्तानचा मर्यादित ओव्हरचा कर्णधार बाबर आझम सध्या मैदानाबाहेरील एका कारणामुळे ट्रोल होत आहे.

मुलीबरोबरचा फोटो व्हायरल

बाबर आझमचा एका मुलीबरोबरचा फोटो व्हायरल झाला असून त्यावरुनच त्याला ट्रोल केलं जात आहे.

तरुणीबरोबरचा हाच फोटो चर्चेत

बाबरला ज्या फोटोवरुन ट्रोल केलं जात आहे त्यामध्ये तो एका तरुणीबरोबर गॉगल घालून फोटोसाठी पोज देताना दिसत आहे.

लूक चर्चेत

बाबर या फोटोमध्ये व्हाइट टी-शर्ट आणि त्यावर जॅकेट अशा लूकमध्ये दिसतोय. त्याने स्किनी जिन्स परिधान केली आहे.

लेडीज जिन्स परिधान केल्याचा दावा

मात्र फोटोत बाबरने परिधान केलेली जिन्स ही लेडीज जिन्स असल्याचा दावा चाहत्यांनी केला आहे.

बऱ्याच वेबसाईटवर मिळते अशी लेडीज जिन्स

बाबरची ही रिप्ड जिन्स महिलांची जिन्स म्हणून वेगवेगळ्या वेबसाइटवर विकली जात असल्याचा दावा चाहत्यांकडून करण्यात आला आहे.

महिलांनी अशीच जिन्स घातल्याचे फोटो व्हायरल

अनेकांनी महिला मॉडेल्सने बाबरने परिधान केलेल्या जिन्ससारखीच जिन्स परिधान केल्याचे फोटोही शेअर केलेत.

यापूर्वीही झालाय ट्रोल

बाबर अशापद्धतीने त्याच्या ड्रेसिंगसाठी ट्रोल होण्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वीही त्याला कपड्यांवरुन ट्रोल करण्यात आलं आहे.

बाबर क्रिकेटपासून दूर

टी-20 वर्ल्ड कपमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर बाबर क्रिकेटच्या मैदानापासून दूर असून तो आता बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत दिसून येणार आहे.

उत्तम कामगिरी करावी अशी चाहत्यांची अपेक्षा

बाबरने सध्या फॉर्म गमावल्याची चर्चा असून 21 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेत त्याने उत्तम कामगिरी करावी अशी चाहत्यांची अपेक्षा आहे.

VIEW ALL

Read Next Story