अंडर-19 आशिया चषक स्पर्धेत उदय सहारन भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. 19 वर्षीय उदय सहारन मूळचा राजस्थानचा असून गेल्या अंडर-19 विश्वचषकादरम्यान त्याची स्टँडबाय म्हणून निवड झाली होती.

अंडर-19 आशिया चषक स्पर्धेसाठी मराठवाड्यातील बीड जिल्ह्याचा फलंदाज सचिन धस याचीही निवड करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यासह राज्यातून त्याचं अभिनंदन करण्यात येत आहे.

मराठमोळा बीडचा सुपुत्र सचिन धसचा समावेश संघात झाला आहे. सचिन हा तडफदार फलंदाज आहे. यापूर्वी, कुचबिहार करंडक स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाचा कर्णधार म्हणूनही सचिनने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

सचिनचे वडिल बीडमधील आरोग्य विभागात असून आई पोलीस अधिकारी आहे. पालकांनी लहानपणापासूनच सचिनच्या क्रिकेट करिअरला प्राधान्य दिलं. सचिनची आवड ओळखून क्रिकेट करिअवरच फोकस केला होता.

बीसीसीआय च्या नॅशनल क्रिकेट अकादमी (एन.सी.ए.-) मार्फत आयोजित शिबिरात सचिन धसने प्रशिक्षण घेतलं आहे. सचिन धस ला शेख अझहर याचं मार्गदर्शन लाभल आहे.

'सचिनने सातत्यपूर्ण खेळी करत अत्यंत मेहनतीने भारतीय संघात आपले स्थान निर्माण केले आहे. या यशाबद्दल सचिनचे मनापासून कौतुक व अभिनंदन. तसेच सचिनला व समस्त भारतीय संघाला एशिया कपसाठी खूप खूप शुभेच्छा!, असे मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

अंडर-19 आशिया चषक 2023 साठी भारतीय संघ

उदय सहारन (कर्णधार), अर्शिन कुलरनी, आदर्श सिंह, रुद्र पटेल, सचिन, प्रियांशू मोलिया, मुशीर खान, अरावेल्ली अवनीश राव, सौम्य कुमार, मुर्गन अभिषेक, इनेश महाजन, धनुष गौड, आराध्या शुक्ला, नमम तिवारी, राज लिंबानी.

VIEW ALL

Read Next Story