राहुल द्रविड यांच्यानंतर आता टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती होणार? यावर सध्या चर्चा होताना दिसतेय.
अशातच, बीसीसीआयने भारताचा पुढील मुख्य प्रशिक्षक होण्यासाठी गौतम गंभीरकडे संपर्क साधल्याची माहिती समोर आली आहे.
त्यामुळे स्टीफन फ्लेमिंग, रिकी पाँटिंग आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांचं नाव बाजूला झाल्याचं समजतंय. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 27 मे आहे.
42 वर्षीय गंभीर आंतरराष्ट्रीय किंवा देशांतर्गत प्रशिक्षणाचा अनुभव नसतानाही कोलकाताला मार्गदर्शन करतोय.
गंभीरने दोन आयपीएल फ्रँचायझींमध्ये कोचिंग स्टाफची जबाबदारी सांभाळली आहे. त्यामुळे बीसीसीआयला त्याच्याकडून अपेक्षा आहेत.
गंभीरने टीम इंडियाला 2007 आणि 2011 मध्ये दोन वेळा वर्ल्ड कप जिंकवून दिलाय. तर आता त्याच्याकडून हेड कोच म्हणून देखील अपेक्षा आहेत.