'हा' स्टार खेळाडू संघातून 'आऊट'
वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध झुंजार विजय नोंदवला आहे. विराट अन् राहुलच्या खेळीमुळे टीम इंडियाचा विजय निश्चित झालाय.
11 ऑक्टोबर रोजी भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध दुसरा सामना खेळणार आहे. त्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसलाय.
टीम इंडियाचा स्टार खेळाडू शुबमन गिल येत्या 9 ऑक्टोबर रोजी संघासोबत दिल्लीला जाणार नाही, अशी माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे.
शुभमन गिलला वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यापूर्वी डेंग्यू झाल्याचं निदान झालं होतं. त्यानंतर त्याला आराम देण्यात आला होता.
आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये चेन्नई येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध संघाचा पहिला सामना खेळू न शकलेला सलामीवीर शुभमन संघाचा पुढील सामना गमावणार आहे.
अफगाणिस्तानविरुद्ध दिल्लीत सामना खेळवला जाणार आहे. शुभमन गिल चेन्नईत परत येईल आणि वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली असेल, असंही बीसीसीआयकडून सांगण्यात आलंय.
दरम्यान, शुभमन गिलच्या अनुपस्थितीत इशान किशन पहिल्या सामन्यात सलामीला आला होता. मात्र, त्याला खास कामगिरी करता आली नाही. तो शुन्यावर बाद झाला.