सोशल मीडियासह, जगभरात या अॅंकरच्या सौंदर्याची चर्चा असते.
झैनाब अब्बास पाकिस्तानची सर्वात सुंदर महिला अॅंकर आहे. पाकिस्तानसोबत भारतातही तिचे खूप चाहते आहेत.
झैनब ही पाकिस्तानची टेलिव्हिजन होस्ट, स्पोर्ट अॅंकर राहिली आहे. तिने मेकअप आर्टिस्ट म्हणूनही काम केले आहे.
पाकिस्तानमध्ये ती कोण्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत.
झैनाबचा जन्म 14 फेब्रुवारी 1988 ला पाकिस्तानच्या लाहोरमध्ये झाला.
झैनबचे वडील नासिर अब्बास देशांतर्गत क्रिकेटर होते. तिची आई आंदलिब अब्बास खासदार राहिली आहे.
झैनबने इंग्लंडच्या वारविक युनिव्हर्सिटीमधून मार्केटिंग अॅंण्ड स्ट्रॅटर्जीमध्ये एमबीए केले आहे.
तिने पाकिस्तानी मीडिया संस्था डॉन आणि दुनिया न्यूजसाठी स्पोर्ट्स आर्टिकल लिहिले आहेत.
झैनब 2019 मध्ये आयसीसी वर्ल्ड कपमधील पाकिस्तानची पहिली महिला स्पोर्ट्स अॅंकर बनली.
2023 मध्ये ती भारतात आली होती. तिच्या हिंदूविरोधी पोस्ट लिहिण्याचा आरोप आहे.
यानंतर झैनब वैयक्तिक कारणामुळे पाकिस्तानात परतल्याचे आयसीसीने सांगितले.