सर्वाधिक Salary घेणाऱ्या Cricket Coaches च्या यादीत द्रविड पहिल्या स्थानी; त्याचा वर्षिक पगार..

नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरु

भारतीय संघाच्या नवीन प्रशिक्षकांचा शोध भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सुरु केला आहे.

नवीन प्रशिक्षकाचा शोध सुरु

राहुल द्रविडचा कार्यकाळ टी-20 वर्ल्डकपनंतर संपत असून नवीन प्रशिक्षकाचा शोध सुरु झाला आहे.

भारतीय प्रशिक्षकांचं मानधनही चर्चेत

क्रिकेटमध्ये केवळ खेळाडूंनाच नाही तर प्रशिक्षकांनाही घसघशीत मानधन दिलं जातं. त्यामुळेच भारतीय प्रशिक्षकांचं मानधनही चर्चेत आहे.

सर्वाधिक मानधन

जगभरातील क्रिकेट प्रशिक्षकांच्या मानधनाबद्दल बोलायचं झालं तर भारतीय संघाच्या प्रशिक्षकाला सर्वाधिक मानधन दिलं जातं.

सर्वाधिक मानधन घेणारे प्रशिक्षक कोणते?

सर्वाधिक मानधन घेणाऱ्या जगभरातील अव्वल पाच प्रशिक्षकांबद्दल आणि त्यांच्या मानधनाबद्दल जाणून घेऊयात...

श्रीलंकन प्रशिक्षक पाचव्या स्थानी

मूळचा इंग्लंडचा असलेला ख्रिस सिल्व्हरवूड हा श्रीलंकन संघाचा प्रशिक्षक आहे. त्याला श्रीलंकन क्रिकेट बोर्ड 50 लाखांचं मानधन देते.

न्यूझीलंडचे प्रशिक्षक चौथ्या स्थानी

न्यूझीलंडच्या संघाने ग्रे स्टेड यांची प्रशिक्षकपदावर नेमणूक केली आहे. स्टेड हे 2018 पासून संघाचे प्रशिक्षक असून त्यांच्या सेवेसाठी त्यांना दरवर्षी 1.74 कोटी रुपये मानधन दिलं जातं.

इंग्लंडच्या संघाबरोबर 4 वर्षांचा करार

न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रॅण्डन मॅकलम हा इंग्लंडच्या कसोटी संघाचं प्रशिक्षक आहे. त्याने इंग्लंड क्रिकेटबोर्डाबरोबर 4 वर्षांचा करार केला आहे.

मॅकलमचं मानधन किती?

इंग्लंड क्रिकेट बोर्ड मॅकलमला चार वर्षांसाठी 16 कोटी 8 लाख रुपये देणार आहे. म्हणजेच दरवर्षी त्याला 4 कोटी 2 लाख मानधन दिलं जातं.

यादीत दुसऱ्या स्थानी ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक

सर्वाधिक मानधन घेणाऱ्या प्रशिक्षकांच्या यादीत ऑस्ट्रेलियन संघाचे मुख्य प्रशिक्षक अॅण्ड्रू मॅकडॉनल्ड यांचा क्रमांक लागतो.

ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकांचं मानधन किती?

ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड अॅण्ड्रू यांना दरवर्षी 6 कोटी रुपये मानधान देतं.

सर्वात श्रीमंत बोर्ड

भारतीय क्रिकेट बोर्ड हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असून प्रशिक्षकाच्या पगावरुनच ते समजून येतं.

द्रविडला किती मानधन मिळतं?

भारताचा प्रशिक्षक राहुल द्रविडला दरवर्षी मानधन म्हणून 10 कोटी रुपये दिले जातात.

VIEW ALL

Read Next Story