यंदाचा आशिया कप 2023 रद्द होणार ?

'या' दिवशी बीसीसीआय घेणार निर्णय!

आयपीएल 2023

सध्या क्रिडाविश्वात एकच चर्चा आहे ती म्हणजे आयपीएलची. यंदाच्या हंगामातील फक्त 2 सामने आता शिल्लक राहिले आहेत.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

आयपीएल 2023 नंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या नजरा भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलकडे लागल्या आहेत.

अंतिम निर्णय कोणता?

WTC नंतर आशिया कप 2023 स्पर्धा होणार आहे. बीसीसीआय बऱ्याच दिवसांपासून या स्पर्धेचे नियोजन करत आहे. मात्र याबाबत अद्याप काहीही अंतिम निर्णय झाला नाही.

यजमानपद

यंदाच्या आशिया चषक 2023 चे यजमानपद पाकिस्तानकडे होते.

पीसीबी म्हणते...

भारत जर आशिया चषकासाठी पाकिस्तानला जाणार नसेल तर पाकिस्तान ही येणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतात येणार नाही, असं पीसीबीने म्हटले होतं.

आशिया कप होणार की नाही?

अशातच या वर्षी आशिया कप 2023 होणार की नाही आणि झाला तर कुठे यावर अजून प्रश्नचिन्ह कायम आहे. पण बीसीसीआय लवकरच यावर निर्णय घेऊ शकते

अध्यक्षांना आमंत्रित

क्रिकबझने केलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयने आयपीएल फायनलसाठी श्रीलंका (SLC), अफगाणिस्तान (ACB) आणि बांगलादेश (BCB) च्या अध्यक्षांना आमंत्रित केले आहे.

आयपीएल फायनल

आयपीएल फायनलदिवशी बीसीसीआय सर्व आशियाई बोर्डांच्या बैठकीनंतर आशिया कप 2023 च्या आयोजनाबाबत घोषणा करू शकते.

बैठक कधी?

भारतात 28 मे रोजी होणार आशिया कपबाबतची बैठक होणार आहे, अशी माहिती समोर आलीये.