मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सध्या काय करतो असा प्रश्न विचारला जात आहे

आयपीएलचा सोळावा हंगाम उलटून आता दोन ते तीन महिने झाले, पण या दोन महिन्यात अर्जुनचं कुठेच नाही नाीहए

स्थानिक क्रिकेटमध्ये अर्जुन गोवा संघाकडून खेळतो, पण रणजी ट्रॉफीसाठी नुकत्याच जाहीर झालेल्या 28 खेळाडूंच्या यादीतही अर्जुनचं नाव नाही

अर्जुन तेंडुलकरची गोवा संघात निवड झाली नाही की तो दुसऱ्या रणजी संघाकडून खेळणार आहे याबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे.

गेल्या रणजी ट्रॉफी हंगामात अर्जुन तेंडुलकरने गोवा संघातून फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. पहिल्याच सामन्यात त्याने शतकही ठोकलं होतं.

या कामगिरीच्या जोरावर अर्जुनला आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून मैदानातही उतरवण्यात आलं. मुंबई इंडियन्ससाठी तो चार सामने खेळला

पण त्यानंतर अर्जुन तेंडुलकरच कुठेच नाव नाही. सध्या देवधर ट्रॉफच्या साऊथ झोन संघात त्याचा समावेश करण्यात आला आहे.

आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर इमर्जिंग एशिया कप स्पर्धेत सचिनला जागा मिळेल असं बोललं जात होतं. पण तसं झालं नाही.

आयपीएलमध्ये दोन हंगाम बेंचवर बसून काढल्यानंतर अर्जुनला तिसऱ्या हंगामात मुंबई इंडियन्सने मैदानावर उतरवलं. अर्जुनने 4 सामन्यात 3 विकेट घेतल्या होत्या.

अर्जुनने 7 फर्स्ट क्लास सामान्यात 12 विकेट घेतल्या आहेत. लिस्ट ए सामन्यात 8 तर टी20 सामन्यात 15 विकेट त्याच्या नावावर आहेत.

VIEW ALL

Read Next Story