क्रिकेट इतिहासातील 10 अविश्वसनीय घटना
11 नोव्हेंबर 2011 रोजी स्थानिक वेळ 11:11 असताना दक्षिण आफ्रिकेला ऑस्ट्रेलियावर विजय मिळवण्यासाठी 111 धावांची गरज होती. स्कोअरबोर्ड वरचे आकडे होते... 11:11 11/11/11
सौरव गांगुलीने 1999 क्रिकेट विश्वचषकात केनियाविरुद्ध 183 धावा केल्या होत्या. लवकरच तो भारताचा कर्णधार झाला. धोनीने 2005 मध्ये पाकिस्तानविरुद्ध 183 धावा केल्या होत्या, त्यानंतर तो भारताचा कर्णधारही बनला होता. कोहलीने 2012 मध्ये 183 धावा केल्या होत्या आणि तोही नंतर भारताचा कर्णधार झाला.
सचिन तेंडुलकर (नाबाद 200), वीरेंद्र सेहवाग (219) आणि रोहित शर्मा (209) धावा केल्या तेव्हा भारताने या तीनपैकी प्रत्येकी 153 धावांनी सामना जिंकला.
वयाच्या 26 व्या वर्षी विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर या दोघांनी 22 वनडे शतके ठोकली होती.
अॅलेक स्टीवर्टचा जन्म 8 एप्रिल 1963 (8-4-63) रोजी झाला. त्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीचा शेवट 8463 ने केला.
एमएस धोनीचे पहिलं कसोटी आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय शतक दोन्ही त्याच्या 5 व्या सामन्यात आले होते, दोन्हीवेळी स्कोअर 148. दोन्ही स्कोर त्याने पाकिस्तानविरुद्ध धावा केले होते.
सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली या दोघांनीही इंग्लंडविरुद्ध 58 वं आंतरराष्ट्रीय शतक नोंदवलं. त्या दोघांचा स्कोअर 103 होता.
राहुल द्रविड आणि चेतेश्वर पुजारा या दोघांनी 67 कसोटी डावात 3000 कसोटी धावा, 87 कसोटी डावात 4000 धावा आणि 108 डावात 5000 कसोटी धावा पूर्ण केल्या.
एलेस्टर कुक आमि मॉकेल क्लार्क या दोघांचे सामने आणि धावांची बेरीज केली तर सचिन तेंडूलकरचा रेकॉर्ड तयार होतो.