इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जातेय. यातला पहिला सामना नॉटिंघममधल्या ट्रेंट ब्रिज मैदानावर खेळवला गेला.
पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने यजमान इंग्लंडवर सात विकेटने मात केली.
ऑस्ट्रेलियाच्या या विजयात ट्रेव्हिस हेड आणि मार्नस लाबुशेनने मोलाची भूमिका बजावली. हेडने 129 चेंडूत नाबाद 154 धावा केल्या. यात 20 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश आहे.
तर मार्नस लाबूशेनने सात चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 61 चेंडूत नाबाद 77 धावा केल्या.
मार्नस लाबूशेनने या सामन्यात ऑलराऊंड कामगिरी केली. फलंदाजी करताना त्याने 77 धावा केल्या. तर गोलंदाजी करताना तीन विकेट घेतल्या. याशिवाय चार कॅचही त्याने झेलल्या.
या कामगिरीमुळे लाबूशेन क्रिकेट इतिहासातील पहिला खेळाडू ठरला ज्याने 50 हून अधिक धावा तीन विकेट आणि चार कॅच टिपल्यात.
पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने 315 धावा केल्या होत्या. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 6 षटकं बाकी ठेऊन पूर्ण केलं.