भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना 7 मार्चला धर्मशाला इथं खेळवला जाणार आहे.
या सामन्यात प्लेईंग इलेव्हनमध्ये काही बदल होऊ शकतात. रजत पाटीदारच्या जागी देवदत्त पडिक्क्लचं टीम इंडियात पदार्पण होऊ शकतं.
देवदत्त पडिक्कलला संधी मिळाल्यास तो या मालिकेत कसोटी पदार्पण करणारा पाचवा भारतीय खेळाडू ठरेल. असं झाल्यास 24 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला जाईल.
इंग्लंडविरुद्धच्या या कसोटी मालिकेत भारताकडून रजत पाटीदार, ध्रुव जुरेल, सर्फराज खान आणि आकाश दीप यांनी आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं आहे.
24 वर्षांनंतर पहिल्यांदाच असं घडलं आहे, ज्यात एकाच कसोटी मालिकेत 4 खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं आहे.
याआधी 2000 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत असं घडलं होतं. या मालिकेत मुरली कार्तिक, वसीम जाफर, मोहम्मद कैफ आणि निखिल चोपडा यांनी पदार्पण केलं होतं.
आता धर्मशाला कसोटीत देवदत्त पडिक्कलचं पदार्पण झाल्यास 2000 सालचा चार खेळाडूंचा विक्रम मोडला जाणार आहे.