इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात अॅशेस क्रिकेट मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसऱ्या म्हणजे लॉर्डस कसोटी मोठा वाद झाला

ऑस्ट्रेलियाचा विकेटकिपर एलेक्स कॅरीने इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेअरस्टोला ज्या पद्धतीने बाद केलं, त्यावरुन प्रश्न उपस्थित केला जात आहे

यानंतर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषि सुनक हे पहिल्यांदा आमने सामने आले.

11 जुलैला नाटो शिखर सम्मेलनात अँथनी अल्बानीज आणि ऋषि सुनक यांची भेट झाली.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी या भेटीचा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी एक पेपर काढून तो कॅमेरासमोर धरला, यावर अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलिया 2-1 ने पुढे असल्याचं दर्शवण्या आलं होतं.

याला उत्तर म्हणून ब्रिटनचे पंतप्रधान ऋषि सुनक यांनी इंग्लंडच्या तिसऱ्या कसोटी विजयाचा फोटो दाखवला

लॉर्ड्समध्ये झालेल्या वादावर ऋषि सुनक यांनी पॅट कमिन्स आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळ भावनेवर प्रश्न उपस्थित केला होता.

ऑस्ट्रेलियाने केलेल्या प्रकाराने कुणीच सामना जिंकू इच्छित नसेल असं बेन स्टोकने म्हटलं होतं. यावर ऋषि सुनक यांनी संमती दर्शवली होती.

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या पाच कसोटी सामन्यात कांगारु 2-1 ने पुढे आहेत. आणखी दोन कसोटी सामने बाकी आहेत.

VIEW ALL

Read Next Story