भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जातेय. यातला दुसरा सामना साडे तीन दिवसातच संपला
सामन्याच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाने इंग्ंडवर 106 धावांनी विजय मिळवला. 9 विकेट घेणारा जसप्रीत बुमराह प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी ठरला
आता भारत आणि इंग्लंडदरम्यानचा तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारीपासून रंगणार आहे. हा सामना राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे.
पण या सामन्याच्याआधीच इंग्लंडने भारत देश सोडला आहे. संपूर्ण इंग्लंड संघ युएईसाठी रवाना झाला.
इंग्लंड क्रिकेट संघाचा कर्णधार बेन स्टोक्सने याची माहिती दिली आहे. इंग्लंड संघ सराव शिबिरासाठी युएईला रवाना झालाय.
तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. त्याआधी म्हणजे 13 फेब्रुवारीपर्यंत इंग्लंड संघ राजकोटला पोहोचेल, असं बेन स्टोक्सने सांगितलं.
वास्तविक इंग्लंडसाठी युएईमध्ये सराव शिबिर ठेवण्यात आलं आहे. मालिकेआधीदेखील इंग्लंडचा संघ युएईत सराव करत होता. आता तिसऱ्या सामन्याआधी पुन्हा युएईमध्ये सराव होईल.