क्रिकेट म्हटलं की षटकार-चौकार हे आलेच. त्यातही टी20 क्रिकेटमध्ये तर षटकार-चौकारांची बरसातच असते.
पण इंग्लंडमधल्या साऊथविक अँड शॉरेहॅम क्रिकेट क्लबने एक असा निर्णय घेतलाय, ज्यामुळे क्रिकेट चाहते हैराण झालेत.
साऊथविक अँड शॉरेहॅम क्रिकेट क्लबने आपल्या मैदानावर होणाऱ्या कोणत्याही सामन्यात षटकार मारण्यावर बंदी घातली आहे.
साऊथविक अँड शॉरेहॅम क्रिकेट क्लबच्या नियमानुसार सामन्यात षटकार मारणाऱ्या खेळाडूला आधी तंबी दिली जाईल. पण दुसऱ्यांदा षटकार मारल्यास त्याला बाद घोषित केलं जाईल
साऊथविक अँड शॉरेहॅम क्रिकेट क्लबने हा निर्णय मैदानाच्या आसपास राहाणाऱ्या लोकांमुळे घेतला आहे.
साऊथविक अँड शॉरेहॅम क्रिकेट क्लबच्या मैदानाच्या आसपास अनेक घरं आहेत. मोठे फटके लगावल्याने घरांच मोठं नुकसान होतंय. शिवाय त्यांच्या जीवालाही धोका आहे.
वास्तविक साऊथविक अँड शॉरेहॅम क्रिकेट क्लबचं मैदानल खूपच लहान आहे. त्यामुळेच क्लबने हा निर्णय घेतला आहे.