भारत आणि वेस्टइंडिजदरम्यानचा पहिला कसोटी सामना डोमिनिकामध्ये खेळवण्यात येणार आहे.
वेस्टइंडिज दौऱ्यात भारतीय संघ 2 कसोटी, 3 एकदिवसीय आणि 5 टी20 सामने खेळणार आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यानचा पहिला कसोटी सामना 12 ते 16 जुलैदरम्यान डोमिनिकामध्ये खेळवला जाणार आहे.
विंडिजच्या धर्तीवर होणाऱ्या क्रिकेट मालिकेबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. ही मालिका मोफत पाहाता येणार आहे.
भारतीय क्रिकेट प्रेमी कसोटी सामने डीडी स्पोर्ट्सवर मोफत पाहू शकतात.
मोबाईलवर सामना पाहायचा असल्यास जिओ सिनेमावर तुम्हाला या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहाता येणार आहे
भारत आणि विडींजदरम्यान कसोटी सामना भारतीयी वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होईल.
पहिल्या कसोटी सामन्यासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया सज्ज झाली आहे.
टीम इंडियात दणक्यात कमबॅक करणारा अजिंक्य राहाणेवर उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
कसोटी क्रिकेटसाठी बीसीसीआयने अनुभवी आणि युवा खेळाडूंचं कॉम्बिनेशन केलं आहे. यशस्वी जयस्वाल, ईशान किशन यांना संघात संधी दिली आहे.