तब्बल 5 महिन्यांनी संघात धाकड फलंदाजाची एन्ट्री

Published by: Zee Team | Feb 01, 2024

कोलकातात रणजी ट्रॉफी सामन्यात मुंबई आणि बंगाल आमने सामने असणार आहे. या सामन्यासाठी मुंबई संघात पृथ्वी शॉचं पुनरागमन झालं आहे.

Published by: Zee Team | Feb 01, 2024

गेल्या अनेक महिन्यांपासून पृथ्वी शॉ दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर होता. आता मुंबई क्रिकेट असोसिएशनने पुढच्या सामन्यासाठी त्याची निवड केली आहे.

Published by: Zee Team | Feb 01, 2024

5 महिने 18 दिवसांपूर्वी पृथ्वी शॉ आपला शेवटचा सामना खेळला होता. यावेळी त्याच्या पायाला दुखापत झाली होती.

Published by: Zee Team | Feb 01, 2024

पृथ्वी शॉ इंग्लंडच्या काऊंटी क्रिकेटमध्ये खेळला होता. 13 ऑगस्टला झालेल्या या सामन्यात त्याला दुखापत झाली

Published by: Zee Team | Feb 01, 2024

बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत त्याच्यावर उपचार सुरु होते. आता एनसीएने त्याला खेळण्यासाठी ग्रीन सिग्नल दिलं आहे.

Published by: Zee Team | Feb 01, 2024

पृथ्वी शॉ जुलै 2021 पासून टीम इंडियातून बाहेर आहे. आता रणजी ट्रॉफीत दमदार कामगिरी करत पुन्हा टीम इंडियात पुनरागमन करण्याचे त्याचे प्रयत्न असतील.

Published by: Zee Team | Feb 01, 2024

VIEW ALL

Read Next Story