विशाखापट्टनम कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसावर यजमान भारताने वर्चस्व गाजवलं. पहिल्या दिवसअखेर टीम इंडियाने 6 विकेट गमावत 336 धावा केल्या.

Feb 02,2024


कसोटी सामन्याचा पहिला दिवस गाजवला तो टीम इंडियाच युवा सलामीवीर यशस्वी जयस्वालने. जयस्वाल 179 धावांवर नाबाद आहे.


टॉम हार्टलीच्या गोलंदाजीवर षटकार खेचत यशस्वी जयस्वालने आपलं शतक पूर्ण केलं. आपल्या 179 धावांच्या खेळीत यशस्वीने 5 षटकारआणि 17 चौकार लगावलेत.


क्रिकेट इतिहासात जी कामगिरी करण्याची संधी शुभमन गिलला होती. ती कामगिरी यशस्वी जयस्वालने करुन दाखवली आहे.


यशस्वी जयस्वालने वयाच्या अवघ्या 22 वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये दोन शतकं करण्याचा विक्रम केला आहे. याआधी सुनील गावसकर यांनी 22 वर्षात चार शतकं केली होती.


इतकंच नाही तर 22 व्या वर्षात क्रिकेटच्या दोन फॉर्मेटमध्ये शतक करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर जमा झालाय. यशस्वीने कसोटी क्रिकेटमध्ये 2 तर टी 20 क्रिकेटमध्ये एक शतक ठोकलंय.


विशाखापट्टणम कसोटीत यशस्वी दुहेरी शतकाच्या उंबरठ्यावर आहे. यशस्वी दुहेरी शतक करत विक्रम रचणार का याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

VIEW ALL

Read Next Story