बाबर आझमचा व्हिडिओ

पाकिस्तान क्रिकेट संघाच कर्णधार बाबर आझमचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हज यात्रेचा अनुभव

या व्हिडिओत तो आपल्या आईबरोबर दिसत असून त्याने आपल्या पहिल्या हज यात्रेचा अनुभव सांगितला.

आईसह हज यात्रेवर

मी आणि आई पहिल्यांचा हज यात्रेवर आलो. पण ही यात्रा वाटते तितकी सोपी नाही

तरुणपणात हज यात्रा

यापुढे तो म्हणतोय, तरुणपणात जे काम करायचं आहे ते केलं पाहिजे, जितका उशीर कराल तितकं ते काम आणखी कठिण होऊन बसेल. हज यात्रेबाबत त्याने हे वक्तव्य केलंय.

कारमधला व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर होणाऱ्या व्हिडिओत बाबर एका कारमध्ये बसलेला दिसतोय. आणि त्याने काळ्या रंगाची टोपी डोक्यावर घातली आहे.

बाबर आझमने केलं टक्कल

पण जेव्हा त्याने डोक्यावरची टोपी हटवली तेव्हा त्याचा नवा लूक समोर आलं. बाबर आझमने चक्क टक्कल केलं आहे.

नवा लूक व्हायरल

बाबर आझमचा टक्कल केलेला लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

कटप्पाशी तुलना

सोशल मीडियावर बाबर आझमच्या नव्या लूकची तुलना कटप्पाशी करत आहेत. काही युझर्सने तर 1980 मधल्या शान चित्रपटातील शाकालचीही उपमा दिली आहे.

पाक-श्रीलंका कसोटी

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम श्रीलंकेविरुद्ध खेळताना दिसणार आहे. पाकिस्तान-श्रीलंकेदरम्यान 16 जुलैला पहिला कसोटी सामना रंगणार आहे.

बाबरच्या नेृतृत्वात भारतात येणार

भारतात होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतही बाबर आझमच्याच नेतृत्वात पाकिस्तान संघ खेळणार आहे.

VIEW ALL

Read Next Story