बंगुळरुमध्ये झालेला तिसार आणि शेवटचा टी20 सामना जबरदस्त नाट्यमय झाला. टीम इंडियाने दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये थरारक विजय मिळवला.
टीम इंडियाच्या या विजयाचा हिरो ठरला तो कर्णधार रोहित शर्मा. प्लेअर ऑफ द मॅचचाही तो मानकरी ठरला. या साममन्यात त्याने पाच विक्रम केले.
रोहित शर्माने 69 चेंडूत 11 चौकार आणि 6 षटकार ठोकत 121 धावा केल्या. या सामन्यात रोहितने तब्बल तीनवेळा फलंदाजी केली.
टीम इंडियाचा कर्णधार म्हणून रोहितने टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 1647 धावा केल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहली असून त्याच्या नावावर 1570 धावा आहेत.
टी20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक षटकार लगावण्याचा विक्रम रोहितने केला आहे. टी20 क्रिकेटमध्ये रोहितने 87 षटकार लगावले आहेत. तर इआन मॉर्गनच्या नावावर 86 षटकार होते.
टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 5 शतक करणारा रोहित शर्मा हा पहिला फलंदाज ठरला आहे. सूर्यकुमार यादव आणि ग्लेन मॅक्सवेल्च्या नावावर प्रत्येकी 4 शतकांचा समावेश आहे.
रोहित शर्मा टीम इंडियासाठी टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक वैयक्तित धावा करणारा दुसऱा फलंदाज ठरालय रोहितने 121 धावा केल्यात. तर शुभमन गिलने 126 धावांसह टॉपवर आहे.
तिसऱ्या टी20त रोहित शर्मा आणि रिंकू सिंगने 190 धावांची भागिदारी केली. टी20 क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी कोणत्याही विकेटसाठी ही सर्वोच्च भागिदारी ठरली आहे.