टीम इंडियाने राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली टी20 वर्ल्ड कप 2024 वर नाव कोरलं. तब्बल 17 वर्षांनी टीम इंडियाने हा ऐतिहासिक विजय मिळवला.

Jul 08,2024


या विजयाबरोबरोट टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडचा कार्यकाळ समाप्त झाला. रोहित, विराट आणि जडेजानेही टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली.


या ऐतिहासिक विजयानंतर भारताचे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी राहुल द्रविडचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. द्रविडला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी त्यांनी केलीय.


देशातील सर्वात मोठा पुरस्कार असलेल्या भारतरत्न पुरस्कारासाठी राहुल द्रविड योग्य व्यक्ती असल्याचं सुनील गावसकर यांनी म्हटलं आहे.


या वर्षीच्या सुरुवातीला काही नेत्यांचा भारतरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या सर्वांचं देशाच्या विकासात महत्त्वाचं योगदान होतं. त्यांचं योगदान हे त्यांच्या भागापूरतं मर्यादित होतं.


पण राहुल द्रविडच्या योगदानाने देशाच्या सर्व समुदायातील लोकांना आनंदाचे क्षण दिले आहेत. देशाती जनतेने सरकारकडे मागणी करावी असंही गावसकर यांनी म्हटलं आहे.


भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडने 164 कसोटी सामन्यात तब्बल 13,288धावा केल्या आहेत. यात 36 शतकं आणि 63 अर्धशतकांचा समावेश आहे.


एकदिवसीय क्रिकेटमध्येही राहुल द्रविडने 10,889 धावा केल्या असून यात 12 शतकं आणि 83 अर्धशतकांचा समावेश आहे.

VIEW ALL

Read Next Story