टीम इंडियाचा क्रिकेटपटू मयांक अग्रवालला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे. मयांक विषारी पेय प्यायला होता.
विषारी द्रव प्यायल्यानंतर मयांकचे ओठ सुजले, त्याचा घसा दुखू लागला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
मयांक अग्रवालला जाणुनबूझून विषारीप पेय देण्यात आलं? विमानात त्याच्या सीटवर ते ड्रिंक कोणी ठेवलं? याची चौकशी सुरु करण्यात आली आहे.
मयांक अग्रवाल टीम इंडियाचा स्टार खेळाडू आहे. त्याचबरोबर त्याची पत्नी आशिता ही नामांकित वकिल आहे.
आशिताने बंगळुरुच्या क्राईस्ट युनिव्हर्सिटीतून कायद्याचं शिक्षण घेतलं. त्यानंतर तीने लंडनमधून मास्टर्स केलं.
मयांक अग्रवालचे सासरे प्रवीण सूद सीबीआयचे संचालक आहेत. साहजिकच मयांकविरुद्ध कट रचला गेला असेल तर आरोपींचा बचाव होणं कठिण आहे.
मयांक अग्रवालची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. लवकरच त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल.