0% Income Tax असलेल्या देशांची यादी पाहिलीत का? शेवटचं नाव पाहून व्हाल थक्क

Published by: Swapnil Ghangale | Feb 01, 2024

भारतात आयकर किती?

भारतामध्ये नोकरदार वर्गाकडून अगदी 5 टक्क्यापासून 15 टक्क्यांपर्यंत आयकर आकारला जातो.

Published by: Swapnil Ghangale | Feb 01, 2024

शून्य आयकर असलेले देश

मात्र एकीकडे भारत आयकर आकारत असताना जगातील काही देशांमध्ये आयकर आकारलाच जात नाही. असे एकूण सात देश आहे जिथे आयकर 0 टक्के आहेत. जाणून घेऊयात अशाच देशांबद्दल...

Published by: Swapnil Ghangale | Feb 01, 2024

1. संयुक्त अरब अमिराती (United Arab Emirates)

जगातील सर्वात वेगाने विकास करणाऱ्या देशांमध्ये युएईचा क्रमांक लागतो. हा देश येथील नागरिकांकडून आयकर आकारत नाही. मात्र वस्तूंवर अबकारी कर आकारला जातो.

Published by: Swapnil Ghangale | Feb 01, 2024

2. बहामाज (Bahamas)

अमेरिका खंडजवळील बेटवजा देशात आयकर आकरला जात नाही. या ठिकाणी घरं फारच सुंदर असून येथे जगभरातील लोक पर्यटनाबरोबरच कायमचे स्थायिक होण्यासाठी येतात.

Published by: Swapnil Ghangale | Feb 01, 2024

3. कतार (Qatar)

आखाती देशांपैकी सर्वात महत्त्वाच्या देशांपैकी एक असलेला कतार हा आयकरमुक्त देश आहे. या देशातील नागरिकांकडून वैयक्तिक स्तरावर कर आकारला जात नाही.

Published by: Swapnil Ghangale | Feb 01, 2024

4. व्हानुआतू (Vanuatu)

व्हानुआतू हा एक छोटा द्वीप-देश असून हा सुद्धा टॅक्स हेवन मानला जाणारा देश आहे. येथील लोकांना आयकर भरावा लागत नाही.

Published by: Swapnil Ghangale | Feb 01, 2024

5. बहरीन (Bahrain)

मध्य आशियामधील आयकरमुक्त देश म्हणून बहरीनलाही ओळखलं जातं. या देशात कोणत्याही व्यक्तीला आयकर भरावा लागत नाही.

Published by: Swapnil Ghangale | Feb 01, 2024

6. मालदीव (Maldives)

भारताबरोबरच्या वादामुळे सध्या चर्चेत असलेला आणि पर्यटनावर अर्थव्यवस्था आधारित असलेल्या मालदीवमध्येही आयकर आकारला जात नाही.

Published by: Swapnil Ghangale | Feb 01, 2024

7. सोमालीया (Somalia)

समुद्री चाच्यांमुळे चर्चेत असलेला सोमालीया हा देश आयकरमुक्त देश आहे असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.

Published by: Swapnil Ghangale | Feb 01, 2024

VIEW ALL

Read Next Story