टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. या कपलला चाहत्यांची पसंती मिळते.

युजवेंद्र चहल आणि धनश्रीसााठी 22 डिसेंबर हा दिवस खूप खास आहे. या दिवशी त्यांच्या लग्नाला 3 वर्ष पूर्ण झाली.

या खास दिवशी युजवेंद्र चहलने पत्नी धनश्रीसाठी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. 'तू मला प्रत्येक दिवशी एक चांगला माणूस बनवतेस' अशा भावना त्याने व्यक्त केल्यात.

मॅरेज एनिवर्सरीच्या दिवशीच युजवेंद्र चहल धनश्रीपासून दूर आहे. सध्या तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टीमबरोबर आहे.

युजवेंद्र चहलची एकदिवसीय संघात निवड करण्यात आली होती. पण त्याला एकही सामन्यात खेळवण्यात आलं नाही

एशिया कप, त्यानंतर एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतही युजवेंद्र चहलला संधी देण्यात आली नव्हती.

दुसरीकडे मॅरेज एनिव्हर्सरीच्या आधी धनश्रीला गुड न्यूज मिळालीय. लवकरच धनश्री एका रिअॅलिटी शोमध्ये दिसणार आहे.

VIEW ALL

Read Next Story