क्रिकेटर रिंकू सिंहने हातावर काढला नवा टॅटू

अनेक भारतीय क्रिकेटर्सना टॅटू काढण्याचं वेड आहे. विराट, हार्दिक सह अनेक क्रिकेटर्सनी शरीराच्या विविध अवयवांवर टॅटू काढले आहेत.

टीम इंडियाचा स्टार क्रिकेट रिंकू सिंह याने त्याच्या हातावर एक नवा टॅटू काढलाय.

रिंकू सिंह हा स्वतः टॅटू प्रेमी असून त्याने शरीरावर यापूर्वी देखील अनेक टॅटू काढलेत.

रिंकू सिंहने काढलेल्या नव्या टॅटूचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रिंकूने 'गॉड्स प्लॅन' असं लिहिलेला टॅटू डाव्या हातावर काढलाय. तसेच त्याच्या कडेला सूर्याचं चित्र काढलेलं आहे.

रिंकू सिंह हा आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळतो. आयपीएल 2023 मध्ये त्याने गुजरात टायटन्स विरुद्ध शेवटच्या 5 बॉलमध्ये 5 सिक्स ठोकल्या होत्या.

रिंकूला भारताकडून टी 20 क्रिकेटमध्ये 23 सामन्यांमध्ये संधी मिळाली. यात त्याने 418 धावा केल्या तर दोन अर्धशतक ठोकली.

तर रिंकूने 2 भारताकडून दोन वनडे सामने खेळताना 55 धावा खेळल्या. आयपीएलमध्ये त्याने 45 सामन्यात 893 धावा केल्या आहेत.

VIEW ALL

Read Next Story