अजिंक्य! या संघाचे एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग 14 विजय, वर्ल्ड रेकॉर्ड तुटणार?

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया संघाने सलग 14 सामने जिंकले आहेत.

सध्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडदरम्यान पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. यापैकी पहिल्या दोन सामन्यात कांगारुंनी विजय मिळवलाय.

16 ऑक्टोबर 2023 मध्ये लखनऊमध्ये वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा पराभव करत विजयी रथाला सुरुवात केली होती.

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग जास्त सामने जिंकण्याचा वर्ल्ड रेकॉर्डही ऑस्ट्रेलियाच्याच नावावर आहे.

ऑस्ट्रेलियाने 11 जानेवारी 2003 ते 24 मे 2003 दरम्यान सल 21 एकदिवसीय सामने जिंकण्याचा विक्रम केला आहे.

त्यावेळी ऑस्ट्रेलियाची कमान रिकी पॉण्टिंग सांभाळत होता.

ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाच्या नावावरही सलग 21 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने जिंकण्याचा विक्रम आहे.

VIEW ALL

Read Next Story