टी20 वर्ल्ड कपनंतर आता पाकिस्तानात 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी रंगणार आहे. 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाईल
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने चॅम्पियन ट्रॉफीचं वेळापत्रक आयसीसीच्या हाती सोपवलं आहे. या स्पर्धेसाठी 8 संघ खेळणार असून चार संघांचे प्रत्येकी दोन ग्रुप असणार आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडियाचा ग्रुप एमध्ये समावेश आहे. या ग्रुपमध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंड संघांचा समावेश आहे.
तर ग्रुप बी मध्ये ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि अफगाणिस्तान या चार संघांचा समावेश आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत आणि पाकिस्तान सामन्याची तारीखही जाहीर केली आहे. यानुसार 1 मार्च 2025 ला हा हायव्होल्टाज सामना खेळवला जाईल.
पीसीबीच्या वेळापत्रकानुसार टीम इंडियाचे सर्व सामने लाहोरमध्ये खेळवले जाणार आहेत. भारत-पाकिस्तान सामनाही लाहोरमध्येच खेळवला जाणार आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने चॅम्पियन्स ट्रॉफीचं वेळापत्रक जाहीर केलं असलं तरी बीसीसीआयने अद्याप टीम इंडिया पाकिस्तानमध्ये खेळणार की नाही याबाबतचा निर्णय जाहीर केलेला नाही.