सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली सारखे अनेक दिग्गज माजी क्रिकेटर्सनी त्यांच्या कारकिर्दीत जबरदस्त परफॉर्मन्स देऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचे नाव उंचावले.
दिग्गज खेळाडूंनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्यांची फॅन फॉलोईंग अजूनही खूप मोठी आहे. खेळाडू त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सुद्धा चर्चेत असतात. त्यामुळे त्यांच्या मुलांना सुद्धा प्रसिद्धी मिळते. तेव्हा दिग्गज क्रिकेटर्सची मुलं सध्या काय करतात याविषयी जाणून घेऊयात.
राहुल द्रविडचा मुलगा समित द्रविड हा सुद्धा क्रिकेटर असून तो सध्या हळूहळू त्याची वेगळी ओळख बनवत आहे. महाराजा टी २० लीगमध्ये समितने डेब्यू केलं असून त्याच्या बॅटिंग स्टाईलमुळे तो सध्या चर्चेत आहे.
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याची मुलगी सना गांगुली हिने युनायटेड किंगडम येथील युनिव्हर्सिटी मधून शिक्षण पूर्ण केले आहे. सना हिने इकोनॉमिक्समध्ये पदवी घेतली असून कॉर्पोरेटमध्ये नोकरी करते. सना सध्या PWC मध्ये नोकरी करत असून तिचे वार्षिक पॅकेज हे ३० लाख इतके असल्याचे बोलले जाते.
सुनील गावसकर यांचा मुलगा रोहन गावसकर हा सुद्धा एक क्रिकेटर आहे. रोहनने भारताकडून एकूण 11 वनडे आंतरराष्ट्रीय सामने खेळले. क्रिकेटमधील निवृत्तीनंतर त्याने सामन्यांमध्ये कॉमेंटेटर म्हणूनही भूमिका बजावली.
सचिन तेंडुलकरला सारा आणि अर्जुन अशी दोन मुलं आहेत. यापैकी सारा हिने लंडनमध्ये तिचे मास्टर्स पूर्ण केले, ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार अशी चर्चा होती. तर अर्जुन तेंडुलकर सुद्धा क्रिकेटमध्ये आपलं करिअर करत असून आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केले.
वीरेंद्र सेहवाग याचा मुलगा आर्यवीर हा सुद्धा क्रिकेटर असून दिल्लीच्या अंडर 16 टीममध्ये खेळला आहे. तो सध्या ट्रेनिंग घेत असून लवकरच मोठ्या लीगमध्ये खेळताना दिसू शकतो.