विराट कोहली, बाबर राहिले मागे; World Cup मध्ये फलंदाजाचा कहर

आयसीसी वर्ल्डकपमधील सातव्या सामन्यात इंग्लंड आणि बांगलादेश संघ आपापसात भिडले.

प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 364 धावांचा डोंगर उभा केला होता. यावेळी डेव्हिड वेगळ्याच फॉर्ममध्ये होता.

डेव्हिड मलानने या सामन्यात 107 चेंडूंमध्ये 140 धावांची खेळी केली. त्याने 5 षटकार आणि 16 चौकार ठोकले.

मलानने यावेळी अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले. त्याने विराट कोहली आणि बाबर आझमलाही मागे सोडलं.

मलानने सर्वात वेगाने सहा एकदिवसीय शतक (डावांच्या हिशोबाने) ठोकण्याचा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे.

त्याच्या आधी इमाम उल-हक (27 डाव), उपुल थरंगा (29 डाव), बाबर आझम (32 डाव), हाशिम अमला (34) ने सर्वात वेगवान 6 शतक ठोकले आहेत.

फेब्रुवारी 2023 मध्ये मलानने 9 डावांमध्ये 84.25 च्या सरासरी आणि 100.14 च्या स्ट्राइक रेटने 674 धावा केल्या होत्या.

मलानने यावेळी 4 शतकही ठोकले होते. मलानने एका कॅलेंडर वर्षात 4 शतकांच्या रेकॉर्डचीही बरोबरी केली आहे.

VIEW ALL

Read Next Story