हरभजन सिंगचा आगडोंब उसळला, म्हणतो...
भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाच्या 15 जणांच्या शिलेदारांची निवड करण्यात आली आहे.
टीम इंडियामध्ये 4 प्रमुख फलंदाज, 2 विकेटकिपर फलंदाज, 4 ऑलराऊंडर्स आणि 4 प्रमुख गोलंदाजांना संधी देण्यात आलीये
मात्र, आर आश्विन आणि यझुवेंद्र चहलला संघात घेण्यात आलं नाही. त्यामुळे एकही राईट हँड फिरकीपटू संघात नसल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय.
अशातच आता टीम इंडियाचा माजी स्टार फिरकीपटू हरभजन सिंग याने आश्चर्य व्यक्त केलं आहे.
यझुवेंद्र चहलला संधात संधी दिली गेली नाही हे ऐकून मला आश्चर्याचा धक्का बसला आहे. तो खरा मॅच विनर आहे, असं हरभजन सिंह म्हणतो.
रोहित शर्माने अक्षर पटेल, रविंद्र जडेजा आणि कुलदीप यादव या त्रिकुटाला पुन्हा एकदा संधी दिलीये.
मात्र, वर्ल्ड कप भारतात होतोय अन् प्रमुख फिरकीपटूला स्थान नसल्याने आता टीम इंडियावर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसत आहे.