इंडियन प्रिमीयर लीग ही जगातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेट लीग असून यात देशविदेशातील खेळाडू सहभागी होत असतात.
आयपीएल लीग ही क्रिकेट लीगमधील सर्वात श्रीमंत लीग म्हणून सुद्धा ओळखली जाते. केकेआरने 2024 च्या ऑक्शनमध्ये मिचेल स्टार्कला 24.75 कोटींना विकत घेतले होते.
तेव्हा आज आयपीएल क्रिकेट टीमच्या हेड कोचला किती पगार मिळतो याविषयी जाणून घेऊयात.
मीडिया रिपोर्ट्सनुसार आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम असलेल्या मुंबई इंडियन्सचा हेड कोच मार्क बाऊचर याला 2.3 कोटी रुपये मिळतात.
गुजरात टायटन्सचा हेड कोच आशिष नेहरा याला प्रत्येक सीजनला 3.5 कोटी रुपये सॅलरी दिली जाते.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीमचा हेड कोच एंडी फ्लावर याला सुमारे 3.2 कोटी रुपये मिळतात.
चेन्नई सुपरकिंग्स त्यांचे हेड कोच स्टीफन फ्लेमिंगला जवळपास 3.5 कोटी इतके पैसे देते.
दिल्ली कॅपिटल्स या टीमने आतापर्यंत एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकलेली नाही. दिल्ली टीमचा हेड कोच रिकी पॉन्टिंग याला जवळपास 3.5 कोटी रुपये दिले जातात.
टीम इंडियाचे माजी हेड कोच राहुल द्रविड हा राजस्थान रॉयल्स सोबत जोडला गेला आहे. यंदाच्या सीजनमध्ये राहुल राजस्थानचा हेड कोच असेल, यासाठी त्याला जवळपास 2 ते 3 कोटी देण्यात आल्याचे बोलले जात आहे.