भारताचा लेग-स्पिनर युझवेंद्र चहलने कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान त्याची डान्सर पत्नी धनश्री वर्माला कसे प्रपोज केलं याबाबत खुलासा केलाय.
इंस्टाग्राम आणि टिकटॉकवर तिचे व्हिडिओ पाहून धनश्रीच्या प्रेमात कसा पडलो हे त्याने सांगितले. यासाठी त्याने ऑनलाइन डान्स क्लासेसबाबत माहिती घेतली आणि तिथूनच प्रेमकहाणी सुरू झाली.
एका मुलाखतीत य़ुझीने याबद्दल सांगितलं की, टिकटॉक आणि इतर अनेक रील्सवर त्याचा डान्स पाहिल्यानंतर मी त्याला मेसेज केला.
पहिले दोन महिने आम्ही डान्सशिवाय इतर कशावरही बोललो नाही. मी अजिबात फ्लर्ट केले नाही. आम्ही मित्रही नव्हतो, आम्ही फक्त डान्सवरच बोलायचो, असं त्याने सांगितलंय.
चहलने एके दिवशी धनश्रीला विचारलं, या लॉकडाऊनमध्येही तू इतकी खुश कशी आहेस? आणि इथूनच आमचा संवाद सुरू झाला.
युझीने सांगितलं की, मी तिला म्हणालो की, मला तुला डेट करायचे नाही, मला तुझ्याशी थेट लग्न करायचंय.
अनेकदा धनश्री युझवेंद्रला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये दिसून येते.
22 डिसेंबर 2020 रोजी अखेर या दोघांनी लग्नगाठ बांधली