ICC च्या अध्यक्षपदी विराजमान होताच जय शाह यांना किती पगार मिळणार?

Published by: Zee Team | Aug 28, 2024

आयसीसी

आयसीसीच्या अध्यक्षपदी जय शाह यांनी बिनविरोध निवड करण्यात आली. 1 डिसेंबरपासून शाह या पदाची सूत्र सांभाळणार असून त्यांच्या किरकिर्दीकडे अनेकांचं लक्ष राहील.

Published by: Zee Team | Aug 28, 2024

सहावे भारतीय

आयसीसीच्या अध्यक्षपदी विराजमान होणारे शाह सहावे भारतीय असून, ते सलग दोन वर्षे हे अध्यक्षपद भुषवू शकतात.

Published by: Zee Team | Aug 28, 2024

पगार

राहिला मुद्दा नव्या पदासाठी शाह यांना पगार किंवा मिळणारं मानधन किती? तर इथंही समीकरणं काहीशी बीसीसीआयसारखीच असल्याचं म्हटलं जातं.

Published by: Zee Team | Aug 28, 2024

बैठका

आयसीसीमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि तत्सम अधिकाऱ्यांना निर्धारित पगारच मिळतो असं नाही. पण, त्यांना विविध बैठका आणि त्यांच्या कामाच्या आधारावर भत्ते आणि सुविधा मिळतात.

Published by: Zee Team | Aug 28, 2024

मानधन

आजपर्यंत आयसीसीकडून तिथं सेवेत असणाऱ्या मंडळींना नेमकं किती मानधन/ पगार दिला जातो याची अधिकृत माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. हो पण, या मंडळींवर सुविधांची बरसात होते ही बाब मात्र खरी.

Published by: Zee Team | Aug 28, 2024

संपत्तीचा आकडा

जय शाह आता या अतिशय महत्त्वाच्या पदावर विराजमान झाल्यामुळं त्यांच्या कारकिर्दीवर तर सर्वांचं लक्ष असणारच आहे पण त्याशिवाय त्यांच्या एकूण संपत्तीचा आकडा किती फरकानं वाढतो यावरी अनेकांचं लक्ष राहणार आहे.

Published by: Zee Team | Aug 28, 2024

VIEW ALL

Read Next Story