विश्वचषकातील या सामन्यात भारताने पाकिस्तानवर सात विकेटने मात केली. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात भारताने विजयाची परंपरा कायम राखली
भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना पाहण्यासाठी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर एक लाखाहून अधिक प्रेक्षक उपस्थित होते.
याशिवाय टिव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरही करोडो चाहते लाईव्ह सामन्याचा आनंद घेत होते. डिज्नी हॉटस्टारवर एका वेळेस तब्बल 3.5 कोटी लोकं लाईव्ह सामना पाहात होते.
क्रिकेटचा कोणताही सामना इतक्या लोकांनी ऑनलाईन पाहाण्याचा हा विश्व विक्रम ठरला आहे. डिज्नी हॉटस्टारने याबाबत माहिती दिली आहे.
आयपीएलच्या सोळाव्या हंगामात गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स दरम्याचा अंतिम सामना 3.2 कोटी लोकांनी पाहिला होता.
आयपीएल अंतिम सामन्याचा हा रेकॉर्ड आता भारत-पाकिस्तान सामन्याने मागे टाकला आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर करोडो प्रेक्षकांनी लाईव्ह सामना पाहिला.
या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 7 विकेटने पराभव केला. पाकिस्तानचा संघ 191 धावात ऑलआऊट झाला. तर विजयाचं हे आव्हान टीम इंडियाने तिसाव्या षटकातच पार केलं.