भारतात खेळली जाणारी यंदाची वर्ल्ड कप स्पर्धा अनेक खेळाडूंसाठी शेवटची असणार आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडू चांगली कामगिरी करण्याच्या प्रयत्नात आहे.

user
user Oct 07,2023


दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज विकेटकीपर आणि फलंदाजही क्विटन डिकॉक हा यापैकीच एक खेळाडू. डिकॉकचा ही शेवटची वर्ल्ड कप स्पर्धा आहे.


विश्वचषक स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच डिकॉकने वर्ल्ड कपनंतर एकदिवसीय क्रिकेटमधून सन्यास घेणार असल्याची घोषणा केली होती. आता डिकॉकने स्पर्धेत दमदार सुरुवात केली आहे.


वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेविरुद्च्या पहिल्याच सामन्यात क्विटन डिकॉकने इतिहास रचला. सलामीला आलेल्या डिकॉकने तुफानी फलंदाजी करत शानदार शतक झळाकवलं.


डिकॉकने अवघ्या 83 चेंडूत शतक ठोकलं. यात त्याने 12 चौकार आणि 3 सिक्स मारले. एकदिवसीय कारकिर्दीतलं हे त्याचं 18 वं शतक ठरलं


क्विटन डिकॉकने रासी वैन डर दुसैंबरोबर तब्बल 204 धावांची भागिदारी केली. डिकॉक 108 धावा करुन पॅव्हेलिअनमध्ये परतला.


डिकॉक, वैन डर आणि मारक्रमच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने 428 धावा केल्या. विश्वचषक स्पर्धेतला ही हायेस्ट धावसंख्या ठरली आहे. याआधी ऑस्ट्रेलियाच्या नावावर 417 धावांचा विक्रम होता.

VIEW ALL

Read Next Story