आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धेत आता सेमीफायनलची चुरस सुर होईल. पहिली सेमीफायनल भारत आणि न्यूझीलंडदरम्यान खेळवला जाणार आहे.

मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर पहिली सेमीफायनल खेळवली जाणार आहे. पण या सामन्याआधी एका नव्या वादाला तोंड फुटलंय

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांच्या फॅन्समध्ये एका प्रोमोवरुनव वाद निर्माण झालाय.

ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्सच्या प्रोमोतला एक फोटो व्हायरल झाला आहे. या भारत आणि न्यूझीलंड सेमीफायनलच्या पोस्टरवर विराट कोहली आणि केन विल्यमसनचा फोटो दाखवण्यात आलाय.

त्यामुळे ब्रॉडकास्टर विराट कोहलीला हिरो दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप रोहित शर्माच्या फॅन्सने कला आहे.

यंदाच्या विश्वचषकात रोहित शर्माचं योगदान विराटपेक्षा जास्त असल्याचं रोहितच्या फॅन्सचं म्हणणं आहे. यावरुन दोन्ही युजर्समध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या कमेंट्स सुरु झाल्या आहेत.

एका युजरने म्हटलंय 2011 वर्ल्ड कप स्पर्धेत गौतम गंभीर आणि युवराज सिंगचं योगदान मोलाचं होतं, पम महेंद्रसंग धोनीला हिरो बनवण्यात आलं.

तर एकाने म्हटलंय 1983 च्या विश्वचषक स्पर्धेत मोहिंदर अमरनाथ प्लेअर ऑफ द मॅच होते, पण त्यांना आज कोणीही ओळखत नाही.

VIEW ALL

Read Next Story