भारतात सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेसाठी टीम इंडियात विकेटकिपर-फलंदाज संज सॅमसनला संधी मिळाली नाही.
पण टीम इंडियातून बाहेर असलेल्या संजू सॅमसनची अचानक लॉटरी लागली आहे. वर्ल्ड कपदरम्यान संजू सॅमसनसाठी एक खुशखभर आहे.
संजू सॅमसनकडे टी-20 संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. सैयद मुश्ताक अली ट्ऱॉफीसाठी संजू सॅमसनकडे केरळ संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. 16 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबरदरम्यान ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.
केरळ संघाचा ग्रुप बी मध्ये समावेश असून त्यांचा पहिला सामना हिमाचल प्रदेशविरुद्ध रंगणार आहे. मुंबईत हा सामना खेळवला जाईल. ग्रुप बीमध्ये केरळ शिवाय सिक्किम, आसाम, बिहार, चंदीगड, ओडिशा आणि सर्विसेजचा समावेश आहे.
केरळ संघात संजू सॅमसनशिवाय श्रेयस गोपालही असणार आहे. गोपाल गेल्याच महिन्यात कर्नाटक संघातून केरळ संघात आला आहे.
संज सॅमसनला विश्व चषकासाठी टीम इंडियात संधी देण्यात आलेली नाही. यावरुन निवड समितीवर टीका करण्यात आली होती. संजू सॅमसन टीम इंडियासाठी आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 20 ऑगस्ट 2023 मध्ये खेळला होता.
संजू सॅमसन टीम इंडियासाठी आतापर्यंत 13 एकदिवसीय आणि 24 टी20 सामने खेळला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 390 तर टीं20 मध्ये 374 धावा केल्या आहेत.