संजू सॅमसनकडे टी-20 संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. सैयद मुश्ताक अली ट्ऱॉफीसाठी संजू सॅमसनकडे केरळ संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. 16 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबरदरम्यान ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.
केरळ संघाचा ग्रुप बी मध्ये समावेश असून त्यांचा पहिला सामना हिमाचल प्रदेशविरुद्ध रंगणार आहे. मुंबईत हा सामना खेळवला जाईल. ग्रुप बीमध्ये केरळ शिवाय सिक्किम, आसाम, बिहार, चंदीगड, ओडिशा आणि सर्विसेजचा समावेश आहे.
संज सॅमसनला विश्व चषकासाठी टीम इंडियात संधी देण्यात आलेली नाही. यावरुन निवड समितीवर टीका करण्यात आली होती. संजू सॅमसन टीम इंडियासाठी आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 20 ऑगस्ट 2023 मध्ये खेळला होता.