आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने विजयाचा षटकार लगावला आहे. पॉईटटेबलमध्ये टीम इंडिया अव्वल आहे.
टीम इंडियाला आता आपला सातवा सामना श्रीलंकेविरुद्ध खेळायचा आहे. येत्या गुरुवारी म्हणजे 2 नोव्हेंबरला मुंबईच्या वानखेडे मैदानावर हा सामना रंगणार आहे
पण श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातही भारताचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या खेळण्याची शक्यता कमी आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हार्दिक दुखापतग्रस्त झाला होता.
दुखापतीमुळे हार्दिक पांड्याला न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्धच्या सामन्याला मुकावं लागलं होतं. आता श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातही तो खेळण्याची शक्यता कमी आहे.
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात स्वत:च्याच गोलंदाजीवर चेंडू अडवताना हार्दिक पांड्याच्या पायाला दुखापत झाली. त्यानंतर त्याला उपचारासाठी बंगळुरुला पाठवण्यात आलं.
यावर भारतीय संघाचे बॉलिंग कोच पारस म्हांब्रे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. वर्ल्ड कपमध्ये हार्दिक पांड्यांच पुनरागमन होईल की नाही याबाबत काहीच सांगता येणार नाही असं म्हांब्रे यांनी म्हटलंय.
वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचं सेमीफायनलचं स्थान जवळपास निश्चित झालंय. अशात हार्दिक पांड्याचं टीम इंडियात असणं महत्वाचं आहे