IND VS AFG : पहिल्या टी-20 सामन्यासाठी रोहितसोबत कोण करणार ओपनिंग?

user
user Jan 09,2024


टी-20 वर्ल्डकप 2024 पूर्वी भारत विरूद्ध अफगाणिस्तान यांच्यात तीन टी-20 सामन्यांची सिरीज खेळवली जाणार आहे. टी-20 वर्ल्डकपच्या तयारीच्या दृष्टीने ही सिरीज खूप महत्त्वाची ठरणार आहे.


महत्त्वाची बाब म्हणजे या सिरीजमध्ये कर्णधारपदाची धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर देण्यात आली असून विराट कोहलीचं देखील टीममध्ये कमबॅक झालं आहे.


मात्र आता रोहित शर्माच्या पुनरागमनामुळे त्याच्यासोबत ओपनिंग कोण करणार हा सर्वात मोठा प्रश्न संघ व्यवस्थापनासमोर आहे. रोहित शर्मासोबत ओपनिंगसाठी यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल हे दोन पर्याय उपस्थित आहेत.


यशस्वी जयस्वालने 2023 साली टीम इंडियासाठी पदार्पण केलं. त्याने 2023 च्या एशियन गेम्समध्ये टीम इंडियासाठी दमदार कामगिरी केली.


जयस्वालने टीम इंडियासाठी 15 टी-20 सामन्यांमध्ये 430 रन केले असून तो त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. याशिवाय त्याने नेपाळविरूद्धच्या सामन्यात शतकंही झळकावलं आहे.


शुभमन गिलने जानेवारी 2023 मध्ये टीम इंडियासाठी टी-20 डेब्यू केला होता. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात डेब्यू केल्यानंतर काही दिवसांत शतक झळकावलं. मात्र गेल्या काही टी-20 सिरीजमध्ये गिलला साजेसा खेळ करता आला नाही. गिलने टीम इंडियासाठी 13 टी-20 सामन्यात 312 रन केलेत.


टी-20 वर्ल्डकप 2022 नंतर टीम इंडियामध्ये यशस्वी जयस्वालने 430 रन केलेत. तर दुसरीकडे, शुभमन गिलने 2023 मध्ये डेब्यू केल्यानंतर 312 रन केलेत.


दोन्ही फलंदाजांची तुलना केली तर यशस्वी जयस्वालचा टी-20 इंटरनॅशनलमधील रेकॉर्ड गिलपेक्षा सरस दिसून येतोय.

VIEW ALL

Read Next Story