जगातील सर्वात मोठं तरंगतं डम्पिंग ग्राऊंड; तीन देशांना सर्वाधिक धोका
World News : जगातील सर्वात मोठं तरंगतं डम्पिंग ग्राऊंड बोस्नियातील वाईसग्रॅडमधील ड्रिना नदीवर आहे. बोस्नियामध्ये प्रदूषणाच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसल्यामुळं या नदीवर पाण्यच्या बाटल्या, गंजलेले बॅरल, जुने टायर असा कचरा जमा झाला आहे.
बोस्निया-हर्जेगोविनातील वाईसग्रॅडमधून ड्रिना नदी आता एक नैसर्गिक जलस्त्रोत राहिली नसून, नदीला कचऱ्याच्या तरंगत्या ढिगाऱ्याची रुप प्राप्त झालं आहे.
या भागात येणारे पर्यटकही कचरा नदीपात्रात फेकतात. हिवाळा आणि पावसाळ्यामध्ये या नदीचं पात्र प्रचंड घाण होऊन ही समस्या आणखी मोठ्या प्रमाणात भेडसावते.
कचरा नदीपात्रात पसरू नये यासाठी इथं स्थानिक प्रशासनाकडून एक बॅरिअर थोडक्यात एक अडथळा निर्माण करण्यात आला आहे. जेणेकरून कचरा संपूर्ण पात्रात पसरणार नाही.
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये ही नदी बोस्निया, सर्बिया आणि मॉन्टेनेग्रो इथून धोक्याच्या पाताळी ओलांडून वाहू लागते. ज्यामुळं बऱ्याचदा पूरसदृश परिस्थिती निर्माण होते.
346 किमीच्या या नदीपात्रात पुढे अनेक उपनद्या मिळता आणि या नदीला अनेक शाखाही फुटतात. अनेकदा या नदीपात्रातील कचऱ्याचं प्रमाण इतकं वाढतं की या परिस्थितीला गारबेज सीजन म्हटलं जातं
या पात्रामध्ये जेव्हा कचऱ्याचं साम्राज्य कमी होतं तेव्हा बोस्निया आणि सर्बियामध्ये नदीवर राफ्टींग केली जाते. (सर्व छायाचित्र- रॉयटर्स)