अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील वरिष्ठ निवड समितीने अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी-20 मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचं 14 महिन्यानंतर टीम इंडियात पुनरागमन झालंय. पण टीम इंडियाला तीन मोठे धक्के बसले आहेत.
टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच्या कॅप्टन्सीसाठी ज्या खेळाडूची चर्चा होती, अशा हार्दिक पांड्याला संघात स्थान दिलं गेलं नाही. तो थेट आयपीएल खेळणार आहे.
हार्दिकबरोबरच जखमी सूर्यकुमार यादव देखील टी-ट्वेंटी मालिकेत खेळणार नाही. सूर्या थेट मुंबई इंडियन्सचा संघात सामील होईल.
ऋतुराज गायकवाडही बोटाच्या दुखापतीमुळे या मालिकेत खेळू शकणार नाही. तो इंग्लंड कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात खेळेल की नाही? असा प्रश्न उभा राहतोय.
अफगाणिस्तानविरुद्घ बीसीसीआयने पुन्हा युवा खेळाडूंवर विश्वास दाखवलाय. टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा, संजू सॅमसन आणि रवी बिश्नोई यांना संधी दिली गेलीये.
युवा खेळाडूंना संधी दिल्याने बीसीसीआय टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी नवा प्लॅन रचते का? असा सवाल विचारला जातोय.