धोनी अन् द्रविडचा रेकॉर्ड मोडला!
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड कपच्या सामन्याला आता सुरूवात झाली आहे. दोन्ही संघ आपला पहिला सामना खळत आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात कॅप्टन रोहित शर्मा याने अनोखा रेकॉर्ड नावावर केलाय.
रोहित शर्मा विश्वचषकाच्या इतिहासात भारताचा कर्णधार बनलेला सर्वात वयस्कर कर्णधार ठरला आहे. रोहित शर्माचं सध्याचं वय 36 वर्षे 161 दिवस आहे.
रोहित शर्माने मोहम्मद अझरुद्दीनचा रेकॉर्ड मोडीस काढलाय. 1999 च्या वर्ल्ड कपमध्ये त्याचं वय 36 वर्ष 124 दिवस होतं.
राहुल द्रविडने 2007 साली टीम इंडियाचं नेतृत्व केलं होतं. तेव्हा त्याचं वय 34 वर्ष 71 दिवस वय होतं.
एस वेंकटराघवन यांनी 1979 मध्ये टीम इंडियाचं नेतृत्व केलं होतं. त्यावेळी त्यांचं वय 34 वर्ष अन् 56 दिवस होतं.
धोनीने 2011 आणि 2015 च्या वर्ल्ड कपमध्ये टीमचं नेतृत्व केलंय. 2015 साली त्याचं वय 33 वर्ष 262 दिवस होतं.