भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. 10 डिसेंबरपासून टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.

सूर्यकुमार यादवला टीम इंडियाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्कराम आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या टी20 वर्ल्डकप 2024 च्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत 24 टी-20 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी 13 सामने भारताने जिंकले आहेत. तर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 10 सामन्यांत विजय मिळवला आहे. एका सामन्याचा निकाल लागला नाही

भारतीय संघ - यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रुतुराज गायकवाड, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुनील, रवींद्र जडेजा (उपकर्णधार). कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20, एकदिवसीय आणि कसोटी मालिकेचे सामने डर्बन, ग्वेबेरेहा, जोहान्सबर्ग, पार्ल, सेंच्युरियन आणि केपटाऊन येथे खेळवले जातील. टी 20 मालिकेतील पहिला सामना संध्याकाळी 7:30 वाजता, तर दुसरा आणि तिसरा सामना रात्री 8:30 वाजता खेळवला जाईल.

स्टार स्पोर्ट्स चॅनलवर तुम्ही भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20, एकदिवसीय आणि कसोटी मालिकेचे थेट प्रक्षेपण पाहू शकता.

डिस्ने प्लस हॉटस्टार अॅपवर तुम्ही भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20, एकदिवसीय आणि कसोटी मालिकेचे थेट प्रवाह पाहू शकता. याशिवाय अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या वेबसाईट झी 24 तासला फॉलो करू शकता.

VIEW ALL

Read Next Story