दोरीच्या उड्या हा केवळ खेळ नसून एक उत्तम फिजिकल अॅक्टिव्हिटी आहे.
मिनिटाभराच्या दोरी उडीच्या व्यायामामुळे सुमारे 10-16 कॅलरीज बर्न होण्यास मदत होते.
लहानमुलांपासून अगदी वयोवृद्धांपर्यंत कोणीही नियमित दोरी उडी मारणं फायदेशीर ठरू शकते.
जाणून घेउया दोरी उडीचे फायदे
दोरी उडी ही एक प्रकारची कर्डियो exercise आहे.
दोरी उडी मारताना आपण जोरात श्वास घेतो आणि सोडतो ,त्यामुळे फुप्फुसांसोबत पूर्ण शरीरात ऑक्सिजनचा प्रसार वाढतो.
दोरी उडीचा सर्वात जास्त फायदा आपल्या शरीराच्या वरच्या भागाला (upper body) ला होतो.
दोरी उडी मारताना आपल्या शरीराचे जास्त वजन हे ढोपरावर पडतं , यामुळे ह्या व्यायामाने तुमचे ढोपर पण मजुबत होउ शकतात.
दोरी उडी फक्त शरीरासाठी नाही तर तुमच्या मेंदूसाठी सुद्धा फायद्याची आहे.
दोरी उडी मारताना आपण सारखे सारखे हातांना वर घेवून जातो मग परत खाली आणतो. यामुळे हातांचे स्नायू मजबूत होतात.