ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला टी20 सामना भारताने दोन विकेट राखून जिंकला. 208 धावांचा डोंगर भारताच्या युवा ब्रिगेडने पार केला.

भारताच्या विजयात महत्वाचा वाटा उचलला तो रिंकू सिंगने. रिंकूने 14 चेंडूत नाबाद 22 धावा केल्या.

सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर एक धावेची गरज असताना रिंकूने षटकार लगावला. पण नो-बॉलमुळे हा षटकार मान्य करण्यात आला नाही.

भारतीय संघाच्या विजयानंतर रिंकू सिंहने आपल्या यशाचं श्रेय कर्णधार महेंद्रसिंग धोनीला दिलंय. शेवटच्या षटकात कसं खेळायचं हा धोनीला दिलेला सल्ला उपयोगी पडल्याचं रिंकूने सांगितलं.

सामन्याआधी माही भाईशी बोलणं झालं होतं, शेवटच्या ओव्हरमध्ये तू काय करतोस असं मी त्याला विचारलं. यावर माहीने शांत राहून खेळ असा सल्ला दिल्याचं रिंकूने सांगितलं.

भारतीय संघाच्या विजयात वेगवान गोलंदाज मुकेश कुमारचंही योगदान महत्त्वाचं ठरलं. इतर गोलंदाज अपयशी ठरत असताना मुकेश कुमारने धावा रोखण्याचं काम केलं.

मुकेश कुमारने चार षटकात केवळ 29 धावा दिल्या. शेवटच्या षटकात मुकेश कुमारने केवळ 5 धावा दिल्या.

VIEW ALL

Read Next Story