200 धावांनंतरही रोहित शर्मानं का नाही केलं जयस्वालचं कौतुक? नेमकं कारण समोर


टीम इंडिया आणि इंग्लंडमधील तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये टीम इंडियाने इंग्लंडचा 434 धावांनी पराभव केला. सामना संपल्यानंतर टीम इंडियाचा ऑलराऊंडर रवींद्र जडेजा याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं.


रोहित शर्मा याच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने कसोटी फॉरमॅटमधील सर्वात मोठी खेळी आपल्या नावावर केली. टीम इंडियाने दुसरा डाव घोषित केल्यावर इंग्लंडचा संघ अवघ्या 122 धावांवर ऑल आऊट झाला.


यशस्वी जेस्वालच्या डमदार 214 रनमुळे भारताला राजकोटमध्ये विजयाचा पाया पटकवता आला तरी रोहितने करिअरच्या सुरुवातीच्या या तरुणाची प्रशंसा केली नाही.यशस्वी जैस्वालने आपल्या टेस्ट कारकिर्दीची अप्रतिम सुरुवात केली असुन तो विराट कोहलीनंतर भारतासाठी सलग दुहेरी शतके ठोकणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.


यशस्वीच्या खेळीवर संपूर्ण जग लक्ष वेधून घेत असताना, रोहितने त्याच्या त्याच्या गेमची प्रशंसा करण्यास टाळलं. रोहित म्हणाला "मी त्याच्याबद्दल बरेच काही बोललो आहे, विझागमध्येही, चेंजरूमच्या बाहेरचे लोकही बोलले आहेत. मला त्याच्याबद्दल जास्त बोलायचे नाही, त्याने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात उच्च स्तरावर केली आहे, त्याने पुढे चालू ठेवावे अशी माझी इच्छा आहे.”


सचिन तेंडुलकरने यशस्विची प्रशंसा करत ट्विट केले 'यशस्वी भव'. राजकोटमध्ये ऐतिहासिक द्विशतकीय खेळीनंतर यशस्वीवर ट्विट करण्यापासून भारताचा महान खेळाडू सचिन स्वत:ला रोखू शकला नाही. टीम इंडियासाठी विजयात सरफराज खानने देखील एक मुख्य भुमिका बजवल्याचं सचिन तेंजूलकरनी म्हणटलं.


सचिनने देन्ही युवा खेळाडूमचं कैतुक करत लिहिले "दुहेरी शतक. दुहेरी अर्धशतक. यशस्वी आणि सरफराजची ही जोडी इंग्लंडसाठी दुहेरी त्रासदायक ठरली आहे. मी त्यांना थेट खेळताना पाहू शकलो नाही, परंतु त्यांच्या खेळीबद्दल ऐकून मला खूप आनंद झाला. कायम ठेवा."


कसोटी मालिकेत अजून दोन सामने बाकी आहेत. पुढचे सामने रांची आणि त्यानंतर धर्मशाला येथे खेलवली जाणार आहेत यशस्वी आणी सरफराज आगामी मॅचमध्ये आणखी किती विक्रम करणार हे पाहणे रंजक ठरेल.

VIEW ALL

Read Next Story