सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत झालं. प्रत्येकाने आपापल्या परीने 2024 वर्षाचं स्वागत केलं. यात भारताची फुलराणी सायना नेहवालही मागे नव्हती.

समुद्रकिनाऱ्यावर सायनाने नव्या वर्षाचं दमदार स्वागत केलं. यावेळचे काही फोटो आणि व्हिडिओ सायना नेहवलाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

समुद्रकिनाऱ्यावर सायना नेहवालने पती पी कश्यपबरोबर हिंदी गाण्यांवर जोरदार डान्सही केला.

सायना नेहवालचा पती पुरुपल्ली कश्यपसुद्धा भारताचा दिग्गज बॅडमिंटन खेळाडू आहे. सायना आणि पी. कश्यप यांचा प्रेमविवाह आहे. बॅडमिंटन खेळतानाच दोघांच्या प्रेमप्रकरणाची सुरुवात झाली.

सायना आणि पी कश्यप यांनी आपल्या काही मित्रांबरोबर समुद्रकिनारी पार्टी करत नव्या वर्षाचं स्वागत केलं.

डान्स आणि गाण्याबरोबरच सायना आणि कश्यपने समुद्रात बोट रायडिंगचाही आनंद लुटला.

नव्या वर्षात सायना नेहवाल आणि पी कश्यपसमोर अनेक आव्हान आहेत. पण त्याआधी दोघांनी सरत्या वर्षाला हसत हसत निरोपही दिला.

VIEW ALL

Read Next Story